झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी, अवैध वाळू उपसाविरुद्ध आज उत्राण सरपंच चे परिवारासह आत्मदहन…

Spread the love

प्रतिनिधी । उत्राण :- शारदा भागवत पाटील सरपंच उत्राण अहिर हद्द तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांनी वारंवार माननीय तहसीलदार ,प्रांत अधिकारी ,पोलीस निरीक्षक यांना वारंवार विनंती करून देखील वाळू उपसा बंद झाला नाही त्यांच्या गावी रात्रंदिवस डंपर व ट्रॅक्टर ने अवैध वाढू उपसा सुरू आहे, उपसाबाबत त्यांनी तहसीलदार सौ सुचिता चव्हाण ,प्रांताधिकारी विनय गोसावी, तसेच पोलीस निरीक्षक सौ निता कायदे यांना लेखी स्वरूपाने, पत्राने तसेच भ्रमणध्वरी व तोंडे तक्रार केली. वारंवार सूचना देऊन देखील वाळू उपसा बंद होत नाही

त्यामुळे त्यांच्या संयमाचा आता बांध फुटला आहे त्यांचे पतींना घेऊन वाळू तस्कर करणाऱ्या विरुद्ध थांबवण्याचा वारंवार प्रयत्न करत होते तेव्हा वाळु तस्करांनी त्यांच्या पतीवर दिनांक 26 /8/ 2022 रोजी रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी प्राण घातक हल्ला केला त्यांच्या डाव्या हाताला तीव्र दुखापत हात फ्रॅक्चर व त्या प्राणघातक खाल्ल्यातून त्यांचे प्राण थोडक्यात बचावले ते वाळू वाहतूक तस्कर नेहमी मारण्याची धमकी देतात,

तसेच गावात मारण्याची चर्चा करतात त्यामुळे ते स्वतः,पती भागवत भिकन पाटील त्यांची मुलगी लीना पाटील मुलगा ऋषिकेश भागवत पाटील हे सामूहिक रित्या वाळू वाहतूक बंद न झाल्यामुळे दिनांक 17/ 10/ 2022 सोमवार रोजी सामूहिक रित्या तहसील कार्यालयात आत्मदहन करणार आहेत. वाळू तस्करांच्या हातून मरण्यापेक्षा आम्ही स्वतःहून मरणे योग्य राहील म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे असे त्यांनी जाहीर केले आहे .
झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन आता तरी जागे हो

टीम झुंजार