शितल अकॅडमीने जपले सामाजिक ऋण…

Spread the love

मंदिरासोबत ज्ञानमंदिराला देखील सहकार्य करा… — भगवान महाजन

धरणगाव :- येथील शितल अकॅडमी व जय हर्ष सार्वजनिक सेवा फाउंडेशन तर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व दप्तर वाटप करून सामाजिक ऋण जपण्यात आले.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, शितल अकॅडमीतर्फे नेहमीच सामाजिक दायित्व निभावले जाते. अकॅडमी चे सदस्य झालेल्या सर्व सभासदांना तसेच त्यांच्या रक्तातील नात्यातील लोकांना दवाखाना, शुभ कार्य तसेच दुःखद प्रसंगात १०,००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. काल दि. १६/१०/२०२२ रोजी झालेल्या कार्यक्रमात अनोरे येथील गुलाब आधार महाजन यांना १०,००० रुपयांची मदत करण्यात आली तसेच गरजू विद्यार्थ्यांना शाळेची बॅग मान्यवरांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष धानोऱ्याचे सरपंच तथा प्रसिध्द काँट्रॅक्टर भगवान महाजन यांनी शितल अकॅडमी व जय हर्ष फाउंडेशन तर्फे राबविण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

समाजातील सुज्ञ नागरिकांनी मंदिरासोबत ज्ञानमंदिराला देखील सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख अतिथी भाजपचे गतनेते कैलास माळी सर, नगरसेवक विजय महाजन, अनोऱ्याचे सरपंच स्वप्निल महाजन, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाची स्तुती करत आयोजकांचे अभिनंदन केले. भविष्यात जी काही मदत लागेल ती करण्याचे व चांगल्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन सर्व मान्यवरांनी दिले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँट्रॅक्टर भगवान महाजन होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे गतनेते कैलास माळी सर, नगरसेवक विजय महाजन, अनोऱ्याचे सरपंच स्वप्निल महाजन, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. तसेच अनोरे येथील मधुकर देशमुख, ज्ञानदेव पाटील, अधिकार पाटील, विश्वास भाटीया, प्रकाश बोरसे, अर्चना पाटील, सुषमा पाटील, वंदना पाटील, गोपाल अग्निहोत्री आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शितल अकॅडमी व जय हर्ष फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शशिकांत माळी यांनी केले त्यात त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव हरी महाजन अनोरेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रितम शिरसाठ यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार