प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :-येथे दिनांक 19 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 28 रूग्णांचे अंतिजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 6,अमळनेर येथील 1 व ग्रामीण भागातील 12 असे तालुक्यातील एकूण 19 रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे.
आढळून आलेल्या रूग्णांमध्ये अमळनेर येथील 32 वर्षीय पुरुष एरंडोल शहरातील दत्त काँलनी परिसरातील 23 वर्षीय पुरुष,मरी माता चौक परिसरातील 71 वर्षीय महिला,ओम नगर परिसरातील 34 वर्षीय पुरुष,सैय्यद वाडा परिसरातील 28 वर्षीय पुरुष,केवडी पुरा परिसरातील 22 वर्षीय महिला,गाढवे गल्ली परिसरातील 42 वर्षीय महिला तसेच ग्रामीण भागातील खडके खुर्द येथील 26 वर्षीय पुरुष, पिंप्री येथील 25 वर्षीय पुरुष,विखरण येथील 49 वर्षीय पुरुष , 34 वर्षीय महिला व 19 वर्षीय युवक, खडके बुद्रुक येथील 59 वर्षीय पुरुष, जवखेडा येथील 17 व 14 वर्षीय युवती, पिंप्री येथील 17 वर्षीय युवक, पिंपळकोठा येथील 21 वर्षीय महिला, रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रिंगणगाव येथील 51 पुरुष व 19 वर्षीय युवक असे एरंडोल तालुक्यातून एकूण 19 रुग्णांचा अहवाल कोरणा पॉझिटिव आढळून आला आहे