निंभोरा प्रतिनिधी:- परमानंद शेलोडे
रावेर :- निंभोरा ता.रावेर येथील कृषी विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पत्रकार संरक्षण समिती चा सन्मान सोहळा संपन्न झाला.
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील निंभोरा बु येथे दिनांक १६/१०/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता नुकत्याच पत्रकार संरक्षण समिती रावेर ग्रामीण तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आलेली असून या नुतन रावेर तालुका ग्रामीण पत्रकार संरक्षण समिती च्या सर्व कार्यकारिणी व सदस्य यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष निंभोरा येथील प्रल्हाद भाऊ बोंडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समिती चे जेष्ठ सल्लागार राजीव बोरसे हे होते यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन पर मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे राजीव जी बोरसे काशिनाथ शेलोडे यांनी व्यक्त केले या सन्मान सोहळा कार्यक्रमात सर्व पत्रकारांना ट्राफी, नियुक्ती पत्र व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकार समितीचे ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रदिप पंजाबी महाराज यांनी समितीचे ध्येय व धोरणे हे पटवून सांगितले व पत्रकारांच्या भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील या बाबतीत माहीती दिली.

सन्मान सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे, जेष्ठ सल्लागार राजीव दादा बोरसे काशिनाथ शेलोडे, ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रदिप पंजाबी महाराज, तालुका उपाध्यक्ष सुमित पाटील, युसुफ शहा, भिमराव कोचुरे, तालुका सचिव विजय एस अवसरमल, सहसचिव अनिल आसेकर ,संघटक अनिल इंगळे, योगेंद्र भालेराव , तसेच समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार कुरकुरे यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






