ऐकावं ते नवलंच ! फाटकी अन् मळकी Jeans चक्क 62 लाख रुपयांना विकली, काय आहे ‘या’ जीन्समध्ये खास

Spread the love

वॉशिंग्टन : – सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही अगदी थक्क करणाऱ्या असतात. अशीच एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. तशा तुम्ही बऱ्याच ब्रँडेड, महागड्या आणि डिझाइनर जीन्स घालत असाल. त्यामुळे तुम्हाला जीन्सची किंमतही माहिती असेल. त्यामुळे फोटोतील ही घाणेरडी जीन्स आणि त्याचा लाखो रुपये किमतीचा आकडा पाहूनच तुम्हाला धक्का बसला असेल. फक्त फोटो पाहूनच कुणी फुकट दिली तरी ही जीन्स नको, असं तुम्ही म्हणाल. पण हीच जीन्स लाखो रुपये देऊन खरेदी करण्यात आली आहे. आता असं या जीन्समध्ये काय खास आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

एक फाटकी अन् मळकी Jeans चक्क 62 लाख रुपयांना विकण्यात आली. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. सध्या या जीन्सचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.

जुनं ते सोनं अशी म्हण प्रचलित आहे. मात्र सर्वच जुन्या वस्तूंना फार किंमत मिळते असं नाही. मात्र अमेरिकेत एका ओसाड खाणीमध्ये १०० वर्षांपूर्वी सापडलेल्या दोन फाटक्या जिन्सना सोन्यापेक्षाही अधिक भाव मिळाला आहे. लिवाइस (Levi’s) जिन्सची ही जोडी तब्बल ६२ लाख रुपयांना विकली गेली. या जिन्स अमेरिकेतील एका निर्मनुष्य खाणीमध्ये १८८० च्या दशकामध्ये सापडल्या होत्या. या जिन्स खाणीतून बाहेर काढून १०० हून अधिक वर्षे झाली असली तरी त्या अद्यापही परिधान करण्यायोग्य आहेत.

https://www.instagram.com/p/CjjPIhHvqAL/?igshid=YmMyMTA2M2Y=

62 लाख रुपयांना विकण्यात आलेल्या या जीन्समध्ये तुम्हाला वाटेल एवढं काय खास आहे? चला तर या विषयी जाणून घेऊया.फाटकी अन् मळकी असलेली ही जिन्स तुम्ही टाकून द्याल पण ही जीन्स न्यू मेक्सिकोमध्ये 62 लाख रुपयांना विकण्यात आली. तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की जीन्स खुप जास्त जुनी आहे, मळकी आहे एवढंच काय तर फाटकी आहे. ओल्ड फॅशन असलेल्या लेव्हिस कंपनीच्या या जीन्सचा लिलाव झालाय. लिलावतात डिओगोच्या एका क्लोथिंग डिलरने डेनिम डॉक्टर्सचे मालक जीप स्वीवनसनसोबत मिळून ही जीन्स विकत घेतली.



या जीन्समध्ये काय खास आहे ?

ही जीन्स खुप जुनी आहे.  1880 सालातील ही जीन्स आहे. हो बरोबर वाचलंत. आमच्या लिहिण्यात चूक झाली नाही. 1980 नाही तर 1880 च. ही जीन्स आतापर्यंत असणे ही खुप हटके बाब आहे. त्यानंतर अगदी काही वर्षापूर्वी जुन्या खाणीत ही जीन्स सापडली होती. तिथे काम करणाऱ्या एका मजुराने ही जीन्स आपल्याकडे ठेवून घेतली होती. या जीन्सचे डिझाईन खुप हटके आणि जुन्या फॅशनचे आहे. सध्या सोशल मीडियावर या जीन्सचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार