जामनेर(प्रतिनिधी):- आरोग्य सेवेसाठी समर्पित आयुष्य जगत असतांना आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा सुद्धा करणाऱ्या विभुतींचा गौरव होणे गरजेचे असल्याचे डॉ.नंदलाल पाटील यांनी नँशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संघटनेच्या धन्वंतरी पुरस्कार सोहळा वितरण वेळी अध्यक्षीय भाषणातून सांगितले.जिनियस पोद्दार इंग्लिश मीडियम स्कुलच्या सभागृहात धन्वंतरी सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.के.पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, जामनेर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर पाटील,होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र ललवाणी,आय.डी.एच्या डॉ.सुषमा पाटील,माजी अध्यक्ष डॉ.प्रशांत भोंडे,माजी अध्यक्ष डॉ.संजीव पाटील हे होते. नँशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन(निमा) हि देशव्यापी अशी मोठी संघटना असुन एखाद्या डॉक्टरांवर येणाऱ्या वाईट प्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभी राहते.असेही पाटील यांनी सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात उद्घाटन झाले.डॉ.पंढरीनाथ बसेर,डॉ.एम.बी. चौधरी, डॉ.एस.डी.महाजन, डॉ.स्नेहांनकीता लोखंडे, डॉ.व्ही.के.पाटील या मान्यवरांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व धन्वंतरी प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक जामनेर तालुका निमा सचिव डॉ.राहुल वाणी यांनी केले सूत्रसंचालन डॉ.नरेश पाटील,डॉ.निवेदिता पाटील,यांनी केले तर आभार डॉ.पराग पाटील यांनी मानले.
यशस्वीतेसाठी डॉ.विनोद भोई,डॉ.पियुष ओस्तवाल, डॉ.प्रशांत पाटील,डॉ.निलेश पाटील,डॉ.विजया पाटील,डॉ.स्वाती विसपुते, डॉ.रविंद्र बडगुजर,डॉ.सुराजसिंग पाटील,डॉ.जगदीश पाटील,डॉ.भगवान बैरागी,डॉ.अनिल पाटील,डॉ.विशाल पाटील,डॉ.जितेंद्र घोंगळे आदी कार्यकारणी सदस्यांनी परिश्रम घेतले.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……