जेष्ठ नागरिकांच्या अधिकारां संदर्भात कायदेविषयक शिबीर

Spread the love

जामनेर(प्रतिनिधी):- तालुका विधी सेवा प्राधिकरण व जामनेर वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने जामनेर न्यायालयात जेष्ठ नागरिकांचे अधिकार ,राष्ट्रीय बालिका दिवस, ग्राहक संरक्षण कायदा, मोटार अपघात कायदा आदींबाबत कायदेविषयक शिबीर घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामनेर येथील दिवाणी न्यायाधीश डी.एन.चामले होते.

यावेळी न्यायाधीश डी.एन.चामले,सह दिवाणी न्यायाधीश बी.एम.काळे,२ रे सह दिवाणी न्यायाधीश पी.व्ही. सुर्यवंशी सहाय्यक सरकारी वकील कृतिका भट, वि.सरकारी वकील अनिल सारस्वत जामनेर वकील संघाचे अध्यक्ष अँड.किशोर राजपुत यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायाधीश डी.एन.चामले.न्यायाधीश बी.एम.काळे,अँड.प्रदिप शुक्ल, यांनी जेष्ठ नागरिकांचे अधिकार, लोक न्यायालय,मध्यस्थी,ग्राहक संरक्षण कायदा,मोटार अपघात कायदा या विषयांवर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी जामनेर वकिल संघाचे पदाधिकारी, सदस्य,कार्यालयीन सहाय्यक अधिक्षक विजय पाटील,कार्यालयीन कर्मचारी ,नागरिक, पक्षकार, बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन अँड.एस.आर.पाटील यांनी आभार तर वकिल संघाचे सचिव अँड.डी.व्ही.राजपुत यांनी मानले.

हे पण वाचा

टीम झुंजार