मुंबई :- लोकल ट्रेनचा प्रवास बघावा तितका सोपा नसतो. ट्रेनमध्ये असणारी गर्दी, गरमीचा त्रास अशा अनेक गोष्टी प्रवाशांना सहन कराव्या लागतात. मुंबईची लोकल ट्रेन नेहमीच प्रवाशांनी गच्च भरलेली दिसते. काही प्रवासी तर जागा नसल्याने दरवाज्यातच उभे राहून प्रवास करताना दिसतात. मात्र यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील की ट्रेनमधून उतरताना किंवा चढताना अपघात होऊन लोकांचा जीव गेला किंवा चालत्या ट्रेनमधून व्यक्ती पडला. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो मुंबईतील लोकल ट्रेनचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन एका प्लॅटफॉर्मवरून जात आहे आणि त्यात माणसांची भरपूर गर्दी दिसत आहे. त्यामुळेच काही लोक ट्रेनच्या दरवाज्यावर लटकताना दिसत आहेत. त्यामधील एक माणूस दरवाज्यावर असलेल्या गर्दीमुळे आणि ट्रेनच्या वेगामुळे तोल जाऊन खाली पडतो. मात्र सुदैवाने ट्रेनच्या खाली येण्यापासून तो थोडक्यात बचावतो आणि त्याला कोणतीही दुखापत होत नाही. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरील इतर लोक त्याला उठण्यास मदत करतात तर इतर त्याची बॅग उचलतात आणि त्याच्याकडे देतात.
या घटनेची नेमकी तारीख आणि वेळ अद्याप समजू शकलेली नाही. हा धक्कादायक व्हिडिओ मुंबईतील एका रेल्वे स्थानकावरील असून,@RoadsOfMumbai नावाच्या आयडीवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. १२ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत १८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण म्हणताहेत की ती व्यक्ती नशिबाने वाचली, तर काही जण ‘मुंबई शहर अपघातांचे शहर’ असे म्हणत आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.