मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टिस्का मिसेस इंडिया २०२२ या गुरगाव (हरियाणा) येथील क्रॉऊन प्लाझा येथे झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत मुंबईची स्ट्रक्चर इंजिनिअर असलेली शालिनी नायर हिने बाजी मारली आणि तिने टिस्का मिसेस इंडिया २०२२ चा किताब पटकावला. त्याशिवाय बॉडी ब्युटिफूल, जॉर्जिअस, ब्यूटी विथ ब्रेन्स, फोटोजेनिकचेही पुरस्कार तिला मिळाले आहे. हा किताब तिला यापूर्वी वर्ल्ड मिसेस इंडिया किताब मिळविलेल्या आदिती गोवात्रिकर हिच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
घाटकोपर आणि चेंबूर परिसरात बालपण गेलेली शालिनी नायर ही मुंबईकर आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातदेखील तिची उत्तम कामगिरी राहिली आहे. मानवतेचे कार्यदेखील ती करत असून सामाजिक क्षेत्राशीही निगडीत आहे. दारिद्र्यरेषेखालील मुलांना शिक्षण देण्याचे ती काम करते. तिला हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.