जळगाव : – सध्या महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार अवकाळी पावसाने थैमान घातले आहे असे असताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी गाजलं होतं. मला पाणीवाला बाबा बनायचंय, असे उद्गार पाटील यांनी काढले होते. मात्र, हे सांगणाऱ्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच तालुक्यात भर हिवाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालीय. पाणी टंचाईमुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तब्बल तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागतेय. तर, विहिरीवर पाण्यासाठी जीव घेणी कसरत करावी लागतेय. शाळकरी विद्यार्थ्यांवर पाणी भरण्याची वेळ आलीय तर शाळा बुडवून काही विद्यार्थांना पाण्यासाठी घरी राहावे लागतेय. यासंदर्भात गुलाबराव पाटील यांना विचारलं असता त्यांनी आकाशातून पाणी देवू का ? असं म्हटलंय.
पहा व्हिडिओ :
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे धरणगाव तालुक्यातील आहेत. धरणगाव शहरात तब्बल महिनाभरांपासून या ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. हिवाळ्यातच तीव्र अशा पाणी टंचाईमुळे घरातील महिला पुरुषांसह शाळकरी मुलांनाही पाण्यासाठी घरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर जावं लागत आहे. आणि याच कारणामुळे मुलांना शाळा बुडवण्याची वेळ आली असल्याचं विदारक चित्र हे पाहायला मिळत आहे. पाण्याच्या टंचाईमुळं हा एखादा दुर्गम भाग आहे, असं तुम्हाला वाटू शकते, हा कुठला दुर्गम भाग नाही.
जळगाव जिल्ह्यातला हा धरणगाव तालुका…विशेष म्हणजे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा तालुका…आणि मतदारसंघ सुद्धा आहे. या धरणगाव शहरात चक्क हिवाळ्यातच पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचं चित्र आहे. एक दोन नव्हे तर तब्बल २० ते २५ दिवसाआड तर कधी महिनाभरानंतर तर कधी याठिकाणी पाणीपुरवठाच होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जावून जीव धोक्यात घालून विहिरीवरून पाणी काढावे लागत आहे. तर पाणी भरण्यासाठी शाळकरी मुलांनाही शाळा बुडवावी लागत आहे. घरातील सदस्य दिवसभर पाणी भरतात, तर मग काम करायचं कस व कुणी..आणि काम करणार नाही तर घरात खायचं काय? आणि जगायचं कस असा प्रश्न महिला उपस्थित करतात.
कधी टँकर बोलवावे लागते, तर पिण्याच्या पाण्यासाठी जार मागवावे लागतात, असा आर्थिक भुर्दंड ही यामुळे सहन करावा लागतोय. पाण्याच्या या समस्येमुळे घरी पाहुणे सुध्दा येत नसल्याच सांगत महिला संताप व्यक्त करतात. इतर ठिकाणचे सोडा आधी पाणीपुरवठा मंत्र्यांनी किमान त्यांच्या मतदार संघात …ते राहत असलेल्या तालुक्यातील पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणीही महिला करताना दिसून येत आहे.
विरोधक काय म्हणतात…
विरोधकांनी गुलाबराव पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. मात्र, त्यांचा प्रशासनावर कुठलाही वचक नाही. नगर पालिकेचा नियोजनशून्य कारभार आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. मंत्र्यांनी राज्यात २२ हजार पाणी पुरवठा योजना मंजूर करून विक्रम केला असेल मात्र त्यांच्यात तालुक्यात नागरिकांना पाणी मिळत नसेल तर त्याला काय अर्थ आहे, निवेदन, आंदोलन करून कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सत्तेपुढे शहाणपण नाही, असच यावरून दिसून येत असल्याची टीका विरोधक माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केली आहे.
मग आकाशातून पाणी देणार का ? : गुलाबराव पाटील
या पाणीटंचाईवर पाणीपुरवठा मंत्री यांनी प्रतिक्रिया जाणून घेतली. धरणगाव शहराला पाणी पुरवठा करणारी या मोटारीत गाळ साचल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यातच ज्या नदीत ही मोटर ठेवली आहे, मोटर नदीत पाणी वाढल्याने बुडाली आहे. ती दुरुस्त करता येत नाही. तर, मग आकाशातून पाणी देणार का ? पाणीटंचाईची निर्माण झाली आहे ती तांत्रिक कारणामुळं निर्माण झाली आहे. त्याचे कोणी भांडवल करू नये असं पाणीपुरवठा गुलाबराव पाटील आहे म्हटले आहे.
राज्यात पाणी पुरवठा योजनांच्या कामे करून विक्रम केल्याच मंत्री गुलाबराव पाटील सांगतात, मात्र त्यांच्याच तालुक्यात नागरिकांना हिवाळ्यातच पाणी टंचाई चां सामना करावा लागत असेल, तर मंत्र्यांनी विक्रम करण्याला खरंच अर्थ उरतो हा मोठा प्रश्न आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.