एरंडोल नगरपालिके मार्फत बचत गटांतील महिलांना शिलाई मशिन वाटप

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल :- नगरपालिका स्तरावर दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत (DAY-NULM) स्वयंरोजगार या घटकातंर्गत वैयक्तीक व्यवसायासाठी बचत गटातील महिला सदस्यांना शिलाई मशिन वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार आबासो, श्री. चिमणरावजी पाटील हे होते. तसेच श्री. विकास नवाळे मुख्याधिकारी तथा प्रशासक न.पा.एरंडोल श्री.शालीभाऊ गायकवाड, श्री. राजेंद्र चौधरी, बैंक ऑप बडोदाचे मॅनेजर श्री. प्रताप मेहेर. श्री. आनंदा चौधरी पत्रकार श्री संजय चौधरी, जाविद मुजावर, श्री. विठ्ठल वंजारी, डॉ. अजित मट. श्री. विकास पंचबुध्दे श्री. विनोदकुमार पाटील, श्री. विक्रम घुगे
श्री. अशोक मोरे, श्री.आनंद दाभाडे आदीसह न.पा.एरंडोल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत (DAY-NULM) स्वयंरोजगार या घटकातर्गत महिलांच्या सामाजिक तसेच आर्थीक उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. बहुतांश कुंटुंबे ही दारिद्रय रेषेखालील जिवन जगत असतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते. त्यांच्याजवळ कमाईचे कुठल्याही प्रकारचे स्थायी साधन नसल्यामुळे महिलांना आपल्या कुटूंबाच्या गरजापूर्ण करण्यासाठी विविध समस्यांचा सामना कराया लागतो

महिलावर कुटूंबाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना नोकरीसाठी शहरात तसेच दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य नसते त्यामुळे महिला घरातून केला जाणारा एखादा लघु उद्योगांच्या शोधात असतात त्यासाठी शिवणकाम एक चांगला पर्याय समजला जातो. परंतु कुंटूंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकरणामुळे त्यांना शिलाई मशिन खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करुन महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बचत गटांतील महिला सदस्यांना शिलाई मशिनसाठी बैंक ऑफ बडोदा, एरंडोल या शाखेमार्फत प्रत्येकी
10000/- रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

यात सौ. सुनिता संजय चौधरी सौ. रूपालि सतिष पाटील, सौ. कविता प्रकाश पाटील, शबानाबी शेख, रिजवानाबी नूर अहमद शेख, बिस्मल्लाबी तस्लिम शेख, शेख शमिमखों सलमादी सलीमोदीन मुजावर, सौ. सुनंदा मंगल महाजन या महिला सदस्यांना मा. आमदार आबासी श्री. चिमणरावजी पाटील व श्री.विकास नवाळे मुख्याधिकारी तथा प्रशासक न.पा.एरंडोल यांच्या हस्ते शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सी. कुसुम पाटील यांनी केले तर कार्यक्रमांची प्रस्ताविक श्री. महेंद्र पाटील यांनी केले.

हे पण वाचा

टीम झुंजार