खिर्डीत फटाक्याच्या दुकानाचे एकूण 9 परवाने..
परमानंद शेलोडे
निंभोरा ता.रावेर (वार्ताहर):- दि 20 धनत्रयोदशि अर्थात दिवाळी 24 आक्टोबर पासून सुरु होणार असून खिर्डी बाजारपेठेत गर्दी होत असतांना दिसत आहे ,जवळच येत असलेला दीपोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याचे चिन्ह दिसून येतआहे, दिवाळीची चाहुल सुरु झाली आहे असे पाहाव्यास मिळत आहे. खिर्डी बस स्टॅण्ड परिसरात आता पासूनच फटाक्याची दुकाने थाटलेली दिसून आलेले आहे.काही जन मोठ्या बजारपेठेकडे सुध्या खरेदि विक्री करण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.दीपावलीच्या पाश्वभुमिवर खिर्डी येथील बाजारपेठ हळूहळू सजत आहे.चार दिवसावर दीपावली सन आहे.खिर्डी बस स्टॅण्ड परिसरात दुकानच दुकाने सजले आहे.

करोना नन्तर यंदा प्रथमच धुम-धडाक्यात साजरी होणार आहे यात शंका नाही,खिर्डी हे 8 खेड्याचे बाजारपेठ आहे, फटाक्याच्या दुकानांचे अर्ज खिर्डी ग्रामपंचायतकडे सादर केले गेले असून सर्व दुकानदारांना दि.20 पासून परवानगी दिली जाणार होती.खिर्डी बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायत ने 9 दुकानाला तात्पूर्ती एन ओसी दिली आहे.निंभोरा पोलीस स्टेशन मधून सुद्धा एनओसी घेतल्याचे समजते.
फटाक्याच्या दरात 40 ते 50 टक्यांनी वाढ
यंदा फटाक्यांना मागणी जास्त असल्याकारणाने व शिवकाशी येथे फटाक्याच्या उत्पादनात घट झाल्याने परिणामी 30ते 35 टक्के फटाक्याचे दर वाढल्याचे दुकानदाराने सांगितले आहे.
दुकानात विविध प्रकारचे फटाके
भुईचकर,अणार,तडतडी फटाके, फुलझाडी,सुतली बाम्ब,रॅकेटसह प्रदूषणमुक्त फटाके विक्रीस आलेचे दुकानदार रमेश बोरनारे यांनी सांगितले.
हे वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……