ऑफिस बॉयने कंपनी मालकाला घातला ४७ लाखाचा गंडा, ११ जणांविरुध्द गुन्हा, चार जणांना अटक

Spread the love

जळगाव: कंपनीशी संबंधित नसलेल्या लोकांच्या नावाने व्यवहार करुन ऑफीस बॉयने इतरांच्या मदतीने ४६ लाख ८७ हजार ७५२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसीतील समृध्दी केमिकल्स व सुबोनियो केमिकल्स प्रा.लि.या कंपनीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ऑफिस बॉय विशाल पोपट डोके (रा.रामेश्वर कॉलनी), लतीफ कमरुद्दीन पिंजारी (रा.पिंप्राळा), प्रल्हाद सुनील माचरे व मयूर जमनादास बागडे(रा.जाखनी नगर) या चौघांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोध सुधाकर चौधरी (रा.सागर नगर) यांच्या मालकीची एमआयडीसीत समृध्दी केमिकल्स प्रा.लि. नावाची कंपनी आहे. विशाल डोके हा कंपनीत ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. त्याने सुबोध यांच्यासह त्यांचे बंधू सुनील चौधरी यांच्या सुबोनियो केमिकल्स प्रा.लि.या कंपनीशी व्यवहार नसलेल्या ६ ऑक्टोबर २०२१ ते १६ सप्टेबर २०२२ या कालावधीत वेळोवेळी बनावट बिल तयार करुन चौधरी बंधूंची बनावट सही करुन बँकामंधून धनादेश वटविले आहेत. दोन्ही भावांच्या कंपनीतून एकूण ४६ लाख ८७ हजार ७५२ रुपयांचा अपहार झाला आहे.या प्रकरणी विशाल पोपट डोके (रा.रामेश्वर कॉलनी), मेघा भूषण खैरनार (रा. खेडी),संजय मणीलाल छेडा (रा.गणेश कॉलनी), लतीफ कमरुद्दीन पिंजारी, ऋषीकेश रावसाहेब पाटील, अविनाश कोमल पाटील (रा.पिंप्राळा), पूनमचंद रामेश्वर पवार (रा.सिंधी कॉलनी),प्रल्हाद सुनील माचरे (रा.एमआयडीसी), विनोद प्रभाकर सोनवणे (रा.शाहू नगर), मयूर जमनादास बागडे व विजय आनंदा सैंदाणे (रा.सुप्रीम कॉलनी) यांच्याविरुध्द अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या ११ जणांच्या नावाने धनादेश तयार करुन अपहार केला आहे.

चौघांना पोलीस कोठडीया संशयितांनी ऑनलाइन गेमसाठी या पैशाचा वापर केल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी संशयितांच्या अटकेसाठी पोलीस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, सुधीर साळवे, किशोर पाटील, मुदस्सस काझी, योगेश बारी, सतीश गर्जे, संदीप धनगर व साईनाथ मुंडे यांचे पथक नियुक्त केले. या पथकाने मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्या.जे.एस.केळकर पोलीस कोठडी सुनावली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार