नवी दिल्ली : – सध्या देशात सर्वत्र गुन्हेगारी चे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच उत्तर प्रदेशातील नोएडातील ओयो हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. नोएडातील गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अन्य टोळ्यांशीही आरोपींचा संबंध होता, असेही सांगण्यात आलं आहे.
आरोपींनी हॉटेलच्या खोल्यांमध्ये छुप्या कॅमेऱ्याने जोडप्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर जोडप्यांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच पैसे देण्यास नकार देणाऱ्याला आरोपींनी व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली. या रॅकेटमध्ये हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग नसल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
पोलिसांनी सांगितले की, टोळीच्या सदस्यांनी आधी ओयो हॉटेल्समधील खोल्या बुक केल्या. त्यानंतर चेकआउट करण्यापूर्वी आरोपींनी खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे लावले. काही दिवसांनी हे लोक पुन्हा हॉटेल्समध्ये गेले आणि त्यांनी कॅमेरे बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी जोडप्यांशी संपर्क साधून पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना आरोपींनी व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली होती.
हे वाचलंत का ?
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………