अमळनेर / जळगांव दि २२ आँक्टोबर २०२२
मराठा सेवा संघ अमळनेर आयोजित NEET /JEE/CET भव्य मोफत मार्गदर्शन शिबीर उत्साहात मराठा समाज मंगल कार्यालय अमळनेर येथे दि २२ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाले.


लातूर पॅटर्न चे सुप्रसिद्ध प्रा .श्री जितेंद्र चव्हाण सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते . तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ . राहुल बाविस्कर नाशिक, अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ . अनिल शिंदे, मराठा समाजअध्यक्ष श्री जयवंतराव , मराठा सेवा संघाचे नाशिक विभाग विभागीय अध्यक्ष श्री श्याम पाटील,कैलास पाटील जिल्हाध्यक्ष ,जिजाऊ ब्रिगेडच्या श्रीमती वसुंधरा लांडगे, श्रीम. शेवाळे ,प्रा . डॉ . लीलाधर पाटील, प्रा .डॉ विलास पाटील उपस्थित होते .


विचारमंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .यावेळी अभियांत्रिकी व मेडिकल क्षेत्रात उल्लेखनीय प्रावीण्य गुण मिळवलेल्या विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात आला . डाँ . राहुल बावीस्कर यांनी विद्यार्थ्याना वैद्यकिय व्यवसाय व आपल्या बालपणी च्या अमळनेरच्या आठवणी ना उजाळा देऊन मार्गदर्शन केले.
. तसेच लातूर पॅटनचे सुप्रसिद्ध प्रा . श्री जितेंद्र चव्हाण सरांनी सखोल विद्यार्थ्याना NEET / JEE / CET बाबत मार्गदर्शन करून आपले करियर बाबत महत्तवपूर्ण टिप्स दिल्या . व परीक्षेविषयी विद्यार्थ्याच्या मनातील भिती दूर करून विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरसन केले . यावेळी इ .१० वी, ११ वी १२ वीच्या विद्यार्थी व पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला . यापुढे ही असे कार्यक्रम वर्षभर होतील असे मराठा सेवा संघाच्या वतीने सांगण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्री रामेश्वर भदाणे, यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री अशोक पाटील कार्याध्यक्ष व श्री बापूराव ठाकरे उपाध्यक्ष यांनी करून दिला . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री प्रेमराज पवार व आभार श्री डाँ कुणाल पवार शहराध्यक्ष अमळनेर यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मराठा सेवा संघाचे सदस्यांनी परिश्रम घेतले .
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम