यवतमाळ :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून त्यानंतर स्वतः झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील वाकी दुधाना शिवारात ही घटना घडली आहे. गजानन दत्ताजी ढोणे (26रा. बेलोरा) असे तरुणाचे नाव असून तरूणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणी अल्पवयीन आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरूण गजानन आणि तरूणी यांचे प्रेमप्रकरण होते. गजानन यवतमाळच्या बेलोरा या गावात राहायचा. प्रेयसीला घेऊन एकांताच्या शोधात घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील वाकी दुधाना शिवारात आले. एका पडीक शेतात भेटीसाठी गेले. गप्पा मारताना अचानक त्यांच्यात वाद झाला. तयारीने आलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि नंतर स्वतः झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
प्रेयसी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे. हे दोघेही दुचाकीने घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथून एकांताच्या शोधात वाकी दुधाना शिवारात आले. प्रेमात धोका दिल्याचा राग गजाननच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने सोबत चाकू व कटर आणले होते. गजाननने कोमलच्या गळ्यावर चाकूने वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. नंतर तिच्या ओढणीने गजाननने झाडाला गळफास लावून घेतला. यात गजाननचा जागीच मृत्यू झाला.
शेतातून घराकडे जात असणाऱ्या मजुरांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरूणी दिसली. मजुरांनी तात्काळ वडगाव जंगल पोलिसांना घटनेची माहिती दिली. तरूणीला वेळेवर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ती वाचली. घटनास्थळावर मुलाची दुचाकी, मुलीची बॅग, धारदार चाकू व कटर आढळून आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हे वाचलंत का ?
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………