धरणगाव :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धरणगाव शाखेतर्फे दिवाळीनिमित्त आदल्या दिवशी रात्री शहरातील सगळे स्मारक धुऊन स्वच्छ करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अभाविप धरणगाव शाखेतर्फे शहरातील सगळे स्मारक धुऊन स्वच्छ करण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक तसेच लाल बहादूर शास्त्री स्मारक ट्रॅंकर च्या साहाय्याने स्वच्छ करण्यात आले.
यावेळी अभाविप प्रांत कार्यकारिणी सदस्य इच्छेश काबरा, शहर सहमंत्री वेदांत भट, अक्षय वाणी, विवेक महाले, प्रथमेश कासार, ओम भोगरे, यश पाटील, शुभम मराठे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नगरसेवक कैलास माळी सर यांनी ट्रँकर उपलब्ध करून दिले.



