मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने मंगळवारी पर्थ येथे श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. १५८ च्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंची सुरुवात संथगतीने झाली पण ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांनी २१ चेंडू शिल्लक असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला. केवळ १७ चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या श्रीलंकन गोलंदाजांवर स्टॉइनिसने विशेष निर्दयीपणा दाखवला.
श्रीलंकेकडून धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने आणि महेश थेक्षाना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, श्रीलंकेने १५७/६ अशी मजल मारली. सलामीवीर पथुम निसांकाने सर्वाधिक ४० धावा केल्या, परंतु त्या धावा करण्यासाठी त्याने ४५ चेंडू घेतले.
धनंजया डी सिल्वाने २३ चेंडूंत २६ धावा केल्या, तर चरिथ असलंकाने २५ चेंडूत ३८ धावा करून १० धावा पार करण्यास मदत केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅश्टन अगर आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मार्कस स्टॉइनिसला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.