धुळे : – बातमी हृदय पिळवटून टाकणारी घटना धुळ्यात घडली आहे. देशात सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु आहे. दिवाळी (Deepawali) म्हटली की फटाक्यांची आतषबाजी आलीच. लहान मुलांना तर या फटाक्यांचे विशेष आकर्षण असते. मात्र फटाके फोडताना (Bursting Crackers) लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. थोडंस दुर्लक्ष केलं तर मुलं काय करतील हे सांगता येत नाही. यातून एखादी दुर्घटना घडण्याचा संभव असतो. अशीच एक दुर्घटना धुळे जिल्ह्यात (Dhule District) घडली आहे. या दुर्घटनेत एका मुलाचा आपला जीव गमवावा लागला आहे.
जुने धुळे येथे एका अल्पवयीन मुलाने फटाके फोडताना केलेल्या करामतीमुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काय आहे घटना ?
काल (सोमवार) रात्री १० वाजेच्या सुमारास सोनू जाधव या अल्पवयीन मुलाने फटाके फोडत असताना एका स्टीलच्या ग्लासामध्ये पेटलेला फटाका टाकला व त्यानंतर या फटाक्याचा बार झाल्यानंतर या स्टीलच्या ग्लासचे तुकडे हवेत वेगाने उडाले. या तुकड्यांपैकी काही तुकडे सोनूच्या अंगात देखील घुसले व त्यानंतर सोनू थोडा अंतर चालून जमिनीवरती कोसळला, त्याच्या नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी सोनुला मृत घोषित केले.
जुने धुळे येथील आदिवासी वस्तीत घडली घटना
जुने धुळे येथे बरफ कारखाना परिसरात असलेल्या आदिवासी वस्तीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. सदर अल्पवयीन मुलगा फटाके फोडत होता. फटाके फोडताना त्याने सुतळी बॉम्ब लावला. यानंतर सुतळी बॉम्बवर स्टीलचा ग्लास ठेवला.
ग्लासाचा तुकडा छातीत घुसला
सुतळी बॉम्ब फुटताच त्यावरील स्टीलच्या ग्लासचे तुकडे झाले. यातील एक तुकडा त्या मुलाच्या छातीत घुसला. यात मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
दिवाळीच्या दिवशीच अशा दुर्दैवी घटनेमुळे धुळे शहरातील सोनू जाधव या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्ती केली जात आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






