पाचोरा :- पाचोरा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आलीय. तालुक्यातील वणगाव मुलाणे येथील पिता आणि पुत्राचा एकाच वेळेस अंत्ययात्रा निघाली. ऐन दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी काय आहे घटना?
वडगाव मुलाणे येथील लालसिंग पंडित पवार हे आपल्या कृष्णा या मुलासोबत दिवाळीच्या दिवशी शेतामध्ये गेले होते. शेतातून परत येत असतांना कृष्णाचा पाय घसरून तो नदीत पडला. यामुळे लालसिंग पवार यांनी देखील नदीत उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही पोहता येत नसल्याने नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाला.
ऐन दिवाळीच्या दिवशीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली. दोन्ही बाप-लेकाच्या पार्थिवावर काल सकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांनी मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम