Video : भारताने हरवल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्याने फोडला टीव्ही, सेहवाग म्हणाला…

Spread the love


मेलबर्न : – सध्या सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.टीम इंडियाची (Team India) आणि पाकिस्तानची (Pakistan) मॅच काल झाल्यानंतर इंडियातील चाहते एकदम खूश झाले, तर पाकिस्तानचे चाहते निराश झाल्याचं पाहायला मिळालं. कालची मॅच रोमांचक झाल्याने चाहत्यांना अधिक मज्जा आल्याची सुध्दा सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे. कारण कालच्या मॅचनंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी जोरदार फटाके वाजवून आनंद साजरा केला आहे.

पहा व्हिडिओ :

कालच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमचा पराभव झाल्यानंतर चाहते एकदम निराश झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राग व्यक्त केला. तर एका चाहत्याने टिव्ही फोडला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. तो व्हिडीओ कुठला आहे अद्याप स्पष्ट आहे. पण त्यामध्ये मॅच पाहताना एकाने टीव्ही फोडला आहे.

विराट कोहली आणि हार्दीक पांड्या या जोडीने कालच्या सामन्यात चांगली बॅटिंग केली. त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.

“हा फक्त खेळ आहे, यात टीव्हीचा काय दोष”

सेहवागने “ऱिलॅक्स शेजारी, हा फक्त खेळ आहे. चांगला प्रयत्न केलात. आमच्या येथे दिवाळी आहे त्यामुळे फटाके फोडत आहेत आणि तुम्ही विनाकारण टीव्ही फोडताय. यात टीव्हीचा काय दोष” असं आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना १-१ बळी घेण्यात यश आले. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर संघाच्या अवघ्या १० धावांवर माघारी परतले होते. मात्र विराट कोहलीने सावध खेळी करून डाव सावरला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल हेही स्वस्तात परतले. संघाची धावसंख्या ३१ असताना ४ गडी बाद झाले होते. अशा स्थितीत किंग कोहलीने संघाचा डाव सावरला आणि अखेरच्या षटकापर्यंत नेला. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

हे वाचलंत का ?

टीम झुंजार