आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांच्या वाढदिसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

Spread the love

वावडदा येथील सरपंच राजेश वाडेकर सर यांनी स्वखर्चाने खरेदी करून रुग्णसेवेसाठी केली दाखल


सुमित पाटील प्रतिनिधी वावडदा

वावडदा दि.20 रोजी वावडदा येथील सरपंच राजेश वाडेकर सर यांनी स्वखर्चाने गावातील ग्रामस्थांसाठी तसेच परिसरातील रुग्णासाठी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर दहा लाख रुपये खर्च करून आज माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्री. आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांच्या वाढदिवशी युवा नेते विशालदादा देवकर यांचा हस्ते लोकार्पण करण्यात आले.


यावेळी मजूर फेडरेशन चे चेअरमन लीलाधर तायडे, पुरुषोत्तम चधरी, अजय सोनावणे, तालुका अध्यक्ष बापू परदेशी, कानळदा येथील सरपंच पुडलिक सपकाळे, भैय्या चव्हाण, पाथरीचे निलेश पाटील, संभाजी पाटील वडली, मधुकर पाटील म्हसावद, ईश्वर पाटील वाकडी, समाधान निकुंभ दापोरा, अरुण पवार सरपंच विटनेर, नितीन जैन, बाबू पिंजारी, समाधान सपकाळे, यांचेसह परिसरातील पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीम झुंजार