भुसावळ :- सध्या महाराष्ट्रात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच राष्ट्रीय महामार्गावर मित्रांसोबत दुचाकीची शर्यंत लावणे वर्गमित्र असलेल्या दोन तरुण अभियंत्यांच्या आयुष्याला पूर्णविराम देणारे ठरले. कारण, इतरांपेक्षा वेगाने पुढे निघण्याच्या बेतात त्यांची १०० किमी वेगातील दुचाकी पुढील डंपरला धडकली. त्यात दोघे रस्त्यावरच गतप्राण झाले. अरफाज मो.इम्तियाज कासीम (वय २२) आणि विष्णू गोविंद कारमुंगे (वय २२) अशी त्यांची नावे आहेत. ऐन लक्ष्मीपूजनाला सोमवारी रात्री ११.३० वाजता ही दुर्घटना घडली.
शहरातील खडका रोडवरील आझाद मार्केट, ३ नंबर उर्दू शाळेजवळील रहिवासी अरफाज मो. इम्तियाज कासीम (वय २२) व गरूड प्लॉट भागातील त्याचा मित्र विष्णू गोविंद कारमुंगे (वय २२) यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण रेल्वे स्कूलमध्ये घेतले. शहरातील एसएसजीबी अभियांत्रिकी कॉलेजमधून बीईची पदवी घेतली. यानंतर पुणे येथे नोकरीला असलेला अरफाज दिवाळीच्या सुटीत शनिवारी (दि.२२) भुसावळात आला. त्याला सोमवारी रात्री ८.३० वाजता विष्णूचा कॉल आला. यानंतर अरफाजने आई व लहान भाऊ फरहान याला विष्णूसोबत बाहेर जात असल्याचे सांगितले. तिकडे विष्णूला देखील त्याच्या आईने दिवाळी असल्याने बाहेर न जाण्याची सूचना केली. तरीही दोघे घराबाहेर पडले. यानंतर अपघात झाला. ही माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. विष्णूवर रात्री, तर मंगळवारी दुपारी अरफाजवर अंत्यसंस्कार झाले. दोघांची अपघातग्रस्त दुचाकी तिसऱ्याच मित्राची आहे. घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात मोहंमद सलीम महेमूद कासीम यांच्या माहितीवरून गुन्हा दाखल झाला.

शर्यतीत चारपैकी तीन दुचाकी निघाल्या पुढे
सोमवारी रात्री अरफाज व विष्णू एका दुचाकीवर, तर इतर मित्र तीन वेगवेगळ्या दुचाकींवर महामार्गावर आले. तेथे त्यांची साकेगाव ते तनारिका हॉटेल हे अंतर जो आधी पार करेल त्यास १० हजार रुपये मिळतील, अशी शर्यत लागल्याची माहिती समोर आली. दरम्यान, तीन केटीएम आणि एका बुलेटवर स्वार असलेले हे मित्र १०० पेक्षा जास्त वेगाने साकेगावकडून हॉटेल तनारिकाकडे निघाले. अरफाज व विष्णू हे एमएच.१९-सीटी.८५७२ या क्रमांकाच्या केटीएम बाइकवर होते. महामार्गावरील मुन्ना तेली यांच्या पेट्रोल पंप परिसरात पटेल टी हाऊस समोर अरफाजचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती पुढील डंपरला धडकली. यानंतर अरफाज व विष्णू हे जागीच ठार झाले.
दोघे जागीच गतप्राण
रात्री ११.३० वाजता अरफाजचे काका मो. सलीम महेमूद कासीम यांना अपघाताची माहिती मिळताच ते व अरफाजचे पत्रकार असलेले वडील मो. इम्तियाज (छोटू) हे घटनास्थळी आले. यावेळी दोघे मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना रिक्षातून डॉ. राजेश मानवतकर यांच्या हॉस्पिटलला नेण्यात आले. पण, उपयोग झाला नाही.
विष्णू कुटुंबातील एकुलता एक
मूळ बिदर (कर्नाटक) येथील रहिवासी असलेले विष्णूचे वडील रेल्वेचे कर्मचारी आहेत. ते गेल्या २० ते २२ वर्षांपासून गरूड प्लॉट भागात वास्तव्यास आहेत. त्यांना विष्णू आणि एक मुलगी असे अपत्य आहेत. मुलगी बारावीनंतरचे शिक्षण घेत आहे. तर बीईनंतर विष्णू पुण्यात नोकरीसाठी प्रयत्न करत होता.
१० हजारांसाठी आयुष्याची माती, शर्यतीत चारपैकी तीन दुचाकी निघाल्या पुढे
सोमवारी रात्री अरफाज व विष्णू एका दुचाकीवर, तर इतर मित्र तीन वेगवेगळ्या दुचाकींवर महामार्गावर आले. तेथे त्यांची साकेगाव ते तनारिका हॉटेल हे अंतर जो आधी पार करेल त्यास १० हजार रुपये मिळतील, अशी शर्यत लागल्याची माहिती समोर आली. दरम्यान, तीन केटीएम आणि एका बुलेटवर स्वार असलेले हे मित्र १०० पेक्षा जास्त वेगाने साकेगावकडून हॉटेल तनारिकाकडे निघाले.
हे वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……