अकोला :- अकोल्या जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात एक धक्कादायक प्रकार घडला असून डॉक्टरांनी मृत घोषित केलेला तरूण चक्क उठून बसला आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. पाणावलेल्या डोळ्यांनी मृत व्यक्तीला अखेरचा निरोप दिला जातो. या कठीण प्रसंगात प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात. या भावनिक क्षणी कुटुंबाला धीर देणं गरजेचे आहे. परंतु अकोला जिल्ह्यातील एका घटनेने सर्व गावकरी हादरले आहेत.
यमराजाच्या मनात आलं अन् परत पाठवलं; चक्क तिरडीवरच उठून बसला ‘मृत तरूण’ .
अंत्यसंस्कारावेळी जे काही घडले ते पाहून सगळेच थक्क झाले.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात २५ वर्षीय प्रशांत मेसरे या तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी विवरा गावात पसरली. मेसरे कुटुंबामध्ये रडारड सुरू झाली. गावकरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते. तिरडी बांधली, अंत्ययात्रा सुरू झाली पण अचानक स्मशानभूमीत घेऊन जाताना हा तरूण उठून बसल्याने अनेकांना धक्का बसला. तो फक्त उठला नाही तर त्याने गावकऱ्यांशी गप्पा मारल्या. या तरुणाला गावच्या मंदिरात ठेवले असून तो बोलत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
गावात घडलेल्या या घटनेची चर्चा जिल्ह्यात पसरली, या तरुणाला पाहण्यासाठी सर्वांनीच गर्दी केली. या प्रकाराची माहिती पोलिसांना कळताच पोलिसही गावात पोहचले. काही लोक याला दैवी चमत्कार असल्याचं सांगत आहेत. प्रशांत हा होमगार्डमध्ये असून त्याच्या अंगात येत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. प्रशांत मेसरे हा काही दिवसांपासून आजारी होता. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल केले होते. बुधवारी प्रशांतची तब्येत खालावली. त्यानंतर अचानक डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केले.
दरम्यान, पोलिसांनी या तरुणासह त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण इतकं गूढ आहे त्यामुळे सत्य बाहेर काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. चिखलीहून गावात प्रशांतला आणण्यात आले. तेव्हा गावातील कुणालाही त्याच्या घरी येऊन दिले नाही. जेव्हा अंत्ययात्रा निघाली तेव्हा मृतदेहाच्या शरीराच्या हालचाली काहींच्या निदर्शनास आल्या. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्या डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केले त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे ही घटना ऐकून कुतूहल वाटत असलं तरी यामागच्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधून काढावी लागणार आहेत.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४