पारोळ्यात श्री स्वामी समर्थ वाचनालयात रंगला ‘हळदीकुंकू’ कार्यक्रम.

Spread the love

कुंडीसह झाड वाण म्हणून भेट;वृक्षरोपणाचा दिला संदेश


पारोळा प्रतिनिधी विशाल महाजन येथील श्री स्वामी समर्थ वाचनालयात महिलांचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा उत्सव अर्थात हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यात महिलांना कुंडीसह झाड वाण म्हणून भेट देण्यात आल्याने हळदी कुंकू कार्यक्रमातून वृक्षरोपणाचा संदेश देण्यात आला.


श्री स्वामी समर्थ वाचनालयात ग्रंथपाल सोनाली सोनार यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजण केले होते.त्यात महिलांनी उत्सूर्फ सहभाग नोंदवत जुन्या विचारांना उजाळा दिला. सोनाली सोनार यांनी आलेल्या महिलांना हल्दी कुंकू देऊन प्रत्येकी एक कुंडी वाण म्हणून भेट दिली.आलेल्या महिलांचे स्वागत देखील ग्रंथपाल सोनाली व मदतनीस अर्चना जैन यांनी केलें. यावेळी रींकल साळी, रत्ना पाटील, पूजा हजारे, ज्योती हजारे,निता टोळकर,अलका मराठे,कृष्णाली पाटील,मनीषा टोळकर,गीता वाणी उपस्तित होत्या.


पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हळदीकुंकू कार्यक्रम आणि वाणांची लूट. काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी, अजूनही हळदीकुंकवाचे महत्त्व मात्र अबाधित असल्याची प्रतिक्रिया महिलांनी ‘तरुण भारत’कडे व्यक्त केल्या.

पूर्वी चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेल्या स्त्रियांना हळदीकुंकवासाठी बाहेर पडता यायचे. आता परिस्थितीत बदलली असली तरी, हळदीकुंकवाच्या प्रथेला मात्र अजूनही तितकेच महत्त्व आहे.
–सोनाली सोनार
ग्रंथपाल,श्री स्वामी समर्थ वाचनालय,पारोळा

टीम झुंजार