अचानक थंडी वाढल्यानं घसा खवखवतोय? आवाज बसला? घरच्याघरी करा ३ सोपे उपाय, घसा होईल मोकळा

Spread the love

3 Easy Effective Home Remedies For Cough and Cold : लगेच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आधी घरच्या घरी काही सोपे उपाय करुन पाहिल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

Highlights

  • तुम्हाला कफ आणि सर्दी असेल तर आवर्जून वाफ घ्यायला हवी.
  • हळदीच्या दुधाचे आयुर्वेदात बरेच महत्त्व सांगितले असून हे दूध प्यायल्यास खवखवणारा घसा कमी होण्यास मदत होते.

दिवाळी सुरु झाली आणि थंडीने राज्यात चांगलाच जोर धरला. दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत पावसाने राज्याच्या अनेक ठिकाणी झोडपून काढले. त्यानंतर अचानक थंडीने जोर पकडल्याने वातावरणात वेगाने बदल होत आहेत. या बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असून हवा बदलली की घसा धरणे, सर्दी-कफ होणे, खोकला येणे, ताप येणे अशी लक्षणे अनेक घरांत दिसायला लागतात. आपले शरीर नव्याने येणाऱ्या ऋतूशी जुळवून घेत असल्याने या सगळ्या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागते. नुकतीच दिवाळी झाली आणि आपलंही त्यानिमित्ताने बाहेर फिरणं झालं असेल तर आपल्याही घरात कोणाला ना कोणाला सर्दी-खोकला, कफ यांपैकी काही ना काही समस्या उद्भवल्या असतील. दिवाळीच्या दिवसांत लगेच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आधी घरच्या घरी काही सोपे उपाय करुन पाहिल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

पाहूया हे उपाय कोणते.

googal pic

१. गुळण्या करणे.

pic for Google

कोणताही विषाणू सगळ्यात आधी आपल्या घशावर आक्रमण करतो. त्यामुळे सुरुवातीला घसा दुखायला लागतो. घशामध्ये इतके खवखवते की आपल्याला खाता येत नाही की नीट बोलता येत नाही. अशावेळी गरम पाणी आणि मीठ किंवा बेटाडीनने गुळण्या करणे हा सर्वात उत्तम उपाय असतो. इथेच आपण या विषाणूला रोखले तर आपला त्रास न वाढता तो नियंत्रणात येण्याचीच शक्यता जास्त असते. घशात सूज किंवा लालसरपणा असेल तर ताप येण्याचीही शक्यता असते त्यामुळे वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी.

२. हळदीचे दूध.

pic for Google

हळद ही एक अतिशय ताकदीची अँटीऑक्सिंडट असल्याने गंभीर समस्यांपासून वाचण्यासाठी हळदीचा चांगला उपयोग होतो. घसा खवखवत असेल किंवा सर्दी झाली असेल तर रात्री झोपताना आवर्जून हळद आणि गूळ घातलेले कोमट दूध प्यायला हवे. त्याने घशाला आराम मिळण्यास मदत होते.

३. वाफ घेणे.

pic for Google

अनेकदा आपल्याला घट्टसर कफ होतो. हा कफ आपल्या डोक्यात, कपाळाच्या भागात, छातीमध्ये साठून राहतो. मात्र वाफ घेतल्यास याठिकाणच्या नसा मोकळ्या होण्यास मदत होते आणि कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्याचे काम काही प्रमाणात सोपे होते. त्यामुळे तुम्हाला कफ आणि सर्दी असेल तर आवर्जून वाफ घ्यायला हवी.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार