पाचोरा : – भाऊबीज साजरी करण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणीचे आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या पाचोरा येथील १७ वर्षीय युवकाचा वालझिरी ( ता. चाळीसगाव) येथील नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. भाऊबीज साजरी करण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणीचे आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या पाचोरा येथील १७ वर्षीय युवकाचा वालझिरी ( ता. चाळीसगाव) येथील नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ ऑक्टोबर रोजी घडली आहे. राहुल सुरेश चौधरी (वय – १७) असे मयत तरुणाचे आहे.
पाचोरा शहरातील श्रीराम नगर येथील रहिवाशी राहुल सुरेश चौधरी हा युवक दि. २७ ऑक्टोबर रोजी भाऊबीजेसाठी आपल्या बहिणीकडे गेला होता. त्याने आपल्या बहिणीचे आशिर्वाद घेत मोठ्या उत्साहात भाऊबीज हा सण साजरा केला.
दरम्यान दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास राहुल हा वालझिरी (चाळीसगाव) येथे नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी याठिकाणी नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता अचानक राहुल याचा पाय घसरून तो थेट खोल पाण्यात पडला. सदरचा प्रकार त्याचे सोबत असलेल्या चिमुकल्यांनी परिवारातील सदस्यांना सांगितला असता तात्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. व लागलीच चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी राहुल यास मृत घोषित केले.
घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मयत राहुल चौधरी याचे पश्चात्य वृद्ध आई, बहिण, बहिण असा परिवार असुन राहुल चौधरी याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम