नवऱ्याने हात-पाय बांधून जिवंत गाडले; पण ऍपलच्या घड्याळाने प्राण वाचवले

Spread the love

मुंबई :- सध्या यासंबंधीत एक बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे, ज्यामध्ये एका नवऱ्याने आपल्या बायकोला संपवण्याचा प्लान आखला आणि त्यानं तसं केलं देखील, पण तरी ही त्याच्या बायकोचे प्राण वाचले. तेही एका घडाळ्यामुळे. तुम्हाला आश्चर्य वाटलं असलं तरी देखील हे खरं आहे.

नवरा-बायकोचं नातं हे मैत्रासारखं असतं, ते दोघेही कधी भांडतात, तर कधी एकमेकांना समजून घेतात. तर कधी एकमेकांवर निरागस प्रेम करतात. एका सुंदर नात्यात या सगळ्या गोष्टी तर येतातच. पण असं असून देखील अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये कधी बायको तर कधी नवरा एकमेकांच्या जिवावर उठले आहेत.

खरंतर आपण बऱ्याचदा काही वस्तूंकडे चौनीच्या वस्तू म्हणून पाहातो किंवा गरज नसताना महागड्या वस्तू विकत घेतो, पण त्या वस्तू कधीकधी आपला जीव देखील वाचवू शकतात.

असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं आहे. खरंतर एका Apple Watchमुळे एका महिलेचे प्राण वाचले आहेत.

ही घटना वॉशिंग्टनमधील आहे. येथे यंग सूक नावाच्या 42 वर्षीय महिलेच्या पतीने तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि नंतर तिला जिवंत गाडले.

पण त्यानंतर देखील ही महिला खड्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाली आणि नंतर तिने तिच्या ऍपल वॉचमधून 911 वर कॉल केला. त्यानंतर या महिलेचा जीव वाचू शकला.

घड्याळातील स्मार्ट डिटेक्शन फीचरमुळे नाही तर इतर काही वैशिष्ट्यांमुळे महिलेचा जीव वाचला आहे.

Apple Watch बद्दल बोलायचे तर ते तुमचे दैनंदिन जीवन खूप सोपे करते. त्याच्या हार्ट रेट सेन्सरने अनेक वेळा जीव वाचवले आहेत. ऍपल वॉचमध्ये पायऱ्या मोजण्यापासून हृदयाचे ठोके मोजण्यापर्यंत अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत. या स्मार्ट डिटेक्शन फिचरमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

परंतू यावेळी महिलेनं कॉलिंग फीचरचा वापर करुन आपले प्राण वाचवलं आहे. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेला ज्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला तो तिचा नवरा होता.

या महिलेनं कॉल केल्यानंतर पोलीस लगेच तिच्या मदतीसाठी धावून आले, तेव्हा महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. ज्यानंतर या महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले आणि पोलिसांनी या महिलेच्या नवऱ्याला अटक केली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार