मुलींच्या स्पर्धेत सरदारजी स्पोर्ट्स.रावेर विजेता तर स्वामी स्पोर्ट्स.रावेर उपविजेता
एरंडोल:- गेल्या तीन दिवसापासून काबरे विद्यालयाच्या प्रांगणावर सुरू असलेल्या 33.वी किशोर/किशोरी जिल्हा अजिंक्यपद आमदार चिमणराव पाटील चषक कबड्डी स्पर्धा.2022 सुरू होत्या या कबड्डी स्पर्धेत जिल्हाभरातून 30 संघांनी आपला सहभाग नोंदवला होता.
या आमदार चिमणराव पाटील चषक कबड्डी स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात क्रीडा प्रबोधनी एरंडोल विरुद्ध पांडव क्रीडा मंडळ कासोदा यांच्यात अंतिम सामना होता एकतर्फी झालेल्या या सामन्यामध्ये क्रीडा प्रबोधनी एरंडोल संघ आमदार चिमणराव पाटील चषक कबड्डी स्पर्धेच्या मानकरी ठरला तर दुसऱ्या क्रमांकावर पांडव क्रीडा मंडळ कासोदा हा संघ ठरला तर तिसऱ्या क्रमांकावर बद्री स्पोर्ट्स बहादरपूर मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामना सरदारजी स्पोर्ट्स रावेर विरुद्ध स्वामी स्पोर्ट्स रावेर यांच्यामध्ये झाला यामध्ये सरदारजी स्पोर्ट्स रावेर हा संघ विजयी झाला. स्वामी स्पोर्ट्स संघ हा उपविजेता ठरला तर तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी स्वामीनारायण स्पोर्ट्स सावदा हा संघ ठरला.
खरचं यंदाचे किशोरगटाचे नियोजन खूपच उत्कृष्ट आणि डोळ्यांची पारणे फेडणारे भव्यदिव्य नियोजन ठरले…किशोरगटाच्या खेळाडुंना पहील्यांदा मँटवर मँचेस खेळण्याचा आनंद पोरांनी अनुभवला,तसेच ग्रामीण भागात अतिशय मजबूत गँलरीत बसून प्रेक्षकांनी आनंद लुटला.विद्युत रोषणाई अप्रतिम होती .भोजनव्यवस्थेबाबतीत अश्विन सारस्वत सारख्या प्रसिध्द आचारींनी तीनही दिवस स्वादिष्ट रुचकर आणि मिष्ठान चवदार भोजन तसेच नाश्ता दिल्यामुळे सर्वांचा पोटभरुन तृप्तीचे ढेकर दिली.
सर्वांत महत्वाचे म्हणजे खेळाचा आत्मा म्हणजे निपक्ष पंचगिरी याचे श्रेय पंचप्रमुख अनिल कोळी यांना जाते.यंदा अनेक नवखे पंच असूनही जुने नवे यांची योग्य सांगड घालुन स्पर्धा सुरळीत पार पाडली भविष्यात एक पंचाची सक्षम फळी निर्माण होतेय ही विशेष बाब.
खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वी पार पांडण्यासाठी चंग बांधणारे नितीन बरडे सतत एरंडोल मध्ये अगदी ठाण मांडून होते. जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष शाम कोगटा,बन्सी माळी सर्व पदाधिकारी पंच संघ व्यवस्थापक यांनीही खूप मोलाचे योगदान दिले. निवड समितीचे हितेश सोनी,हरीश शेळके यांचे संयमी मार्गदर्शन लाभत होते.
पुनश्च एकदा उत्कृष्ट आयोजनाबाबत क्रीडा प्रबोधनी एरंडोलचे श्री. दिपक वाल्डे,डाँ राहुल वाघ ,राकेश चौधरी,गणेश वाल्डे ,मनिष ठाकूर , जितू,शुभम तसेच सर्व सदस्यांनी जीव ओतून स्पर्धा यशस्वी केली.
जळगांव जिल्हा कबड्डी असोसिएशन, क्रीडा प्रबोधिनी, एरंडोल आयोजित ३३ वी किशोर/किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आमदार चषक-२०२२ बक्षिस वितरण सोहळा आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
याप्रसंगी मा.नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, रमेश परदेशी, किशोर निंबाळकर, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, शहरप्रमुख आनंदाभाऊ चौधरी(भगत), मयुर महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिकभाऊ गायकवाड, प्रवराज पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी डाॕ.सुधीर काबरा, रविंद्र पाटील, प्रभाकर सोनवणे, अशोक चौधरी, उपशहरप्रमुख गुड्डु जोहरी मा.नगरसेवक चिंतामण पाटील, गोविंदा बिर्ला, शिवाजी पाटील, यांचेसह कबड्डी खेळाडु, आयोजक, क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या कबड्डी स्पर्धेकरिता क्रीडा प्रबोधनीचे अध्यक्ष राकेश चौधरी उपाध्यक्ष डॉक्टर राहुल वाघ सचिव दीपक वाल्डे खजिनदार विजय पाटील यांचे सह सर्व सदस्य,खेळाडू कबड्डी प्रेमी नागरिक यांनी सहकार्य केले.