मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे सावंतवाडी तालुक्यातील गरजू रुग्णांना तसेच होतकरू विद्यार्थ्यांना आज धनादेश प्रदान करण्यात आले. इन्सुली येथील प्रियांका पोपकर या कॅन्सरग्रस्त महिला रूग्ण,सोनुर्ली येथील गंभीर अपघातामुळे दिव्यांग विद्यार्थी तन्मय गावकर या दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये
तसेच बांदा येथील नाबर स्कूल मधील इयत्ता नववीच्या वर्गातील होतकरू विद्यार्थी प्रभाकर परब याच्या थकीत फी साठी आर्थिक मदत म्हणून त्याच्या विधवा निराधार आईला (सुरेखा परब) तेरा हजार आठशे रुपयांचा धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या प्रसंगी इन्सुलीचे सामाजिक कार्यकर्ते नाना पेडणेकर आणि आमडोसकर उपस्थित होते.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.