जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
वृषभ :-
कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता.
मिथुन :-
घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल.
कर्क :-
शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल.
सिंह :-
बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
कन्या :-
आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील.
तूळ :-
बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.
वृश्चिक :-
गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
धनू :-
दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात.
मकर :-
आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल.
कुंभ :-
आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
मीन :-
नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






