बुलडाणा :- सध्या अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच बुलढाण्यात (Buldhana) एक गंभीर घटना घडली आहे. पत्नीला कार (Car learning) शिकवायला गेलेल्या एकाची कार थेट विहिरीतच जाऊन कोसळली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या कारमध्ये पती, पत्नी आणि मुलगी असे तिघेही होते. मात्र अचानक कार रेस झाली आणि नियंत्रण सुटल्यामुळे ती थेट विहिरीत (Car fell into river) कोसळली.
विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून अपघातग्रस्त कार थेट विहीरीत कोसळली आहे. या घटनेत पत्नीसह मुलगी पाण्यात बुडाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी विहीरीजवळ एकच गर्दी केली होती. (Car Accident in Buldana)

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी येथे हा भीषण अपघात झाला. अपघातापूर्वी पती आपल्या पत्नीला कार शिकवत होता. मात्र कार शिकवत असताना कारची अचानक रेस वाढली अन् कारवरचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट विहीरीत कोसळली. या घटनेत पत्नी आणि मुलीचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान कार विहिरीत कोसळल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ सर्वांना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे विहिरीच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनाग्रस्त कारमधील पतीला क्रेनच्या सहाय्याने वाचविण्यात यश आलं असून त्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात आलं आहे. पतीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मुलगी आणि पत्नीचा अद्याप शोध लागलेला नाही.
गावाच्या मधोमध विहिर असल्याने कार चालवताना अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली असावी, अशी चर्चा आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






