अनुराधा कुबेर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर.

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दरवर्षी ५० वर्षांखालील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिकांना “गानसरस्वती” पद्मविभूषण किशोरी आमोणकर पुरस्कार दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, मुंबई तर्फे दिला जातो. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे स्वरूप असलेला हा पुरस्कार किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या वतीने दिला जातो. २०२१ चा हा पुरस्कार भिंडी बाजार घराण्याच्या गायिका विदुषी अनुराधा कुबेर यांना जाहीर झाला आहे. अनुराधा कुबेर यांनी टी. डी. जानोरीकर यांच्याकडून अनेक वर्षे तालीम घेतली आहे. तसेच सुप्रसिद्ध संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते याच्याकडून त्या तालीम घेत आहेत.

अनुराधा कुबेर यांनी संगीतात एम. ए. केलेले आहे. आकाशवाणीच्या उच्च मान्यताप्राप्त कलाकारांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. देश-परदेशात शेकडो कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. ‘रागामाला’ हे स्वतःचे संगीत विद्यालय त्या चालवतात. त्यांना गानहिरा, दत्तोपंत देशपांडे, बहुस्पर्शी गायिका माणिक वर्मा, सुधीर फडके, युवोन्मेष, पैगंणकर, उषा अत्रे-वाघ, सुरमणी असे अनेक मानाचे विशेष पुरस्कार यापूर्वी मिळालेले आहेत.

टीम झुंजार