एरंडोल :- शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खडके सिम गावालगत नांदगाव येवला राज्य मार्गाला लागूनच असलेल्या अकरा एकर शेतात आजूबाजूस तूर व मका पेरून शेताच्या मध्ये गांजाची लागवड केलेली शेती आढळून आली.
दिनांक 3 गुरुवार रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी आपले सहकारी सोबत घेऊन या शेतात गेले. परंतु सायंकाळ झाल्यामुळे व अंधारअसंल्यामुळे पंचनामा न झाल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही.शुक्रवार दि 4 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस प्रशासना तर्फे देण्यात आली आहे.
आमचे वार्ताहर शेतात घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या नागरिकांना विचारणा केली असता माहिती मिळाली की शेताचे मालक हे बाहेरगावी राहतात अशी माहिती मिळाली. आता या शेतात रात्री पोलिसाचा बंदोबस्त लावलेला आहे. या शेतात चारही बाजूने तार कंपाऊंड केलेले आहे. व रोड लगत दिशेने लोखंडी गेट लावले आहे. शुक्रवारी सकाळीच पोलिस पंचनामा करून किती गांजाची लागवड केली होती व त्याची किंमत किती निघेल हे सर्व समजणार आहे.शेतमालक अगरबाहेरगावी असतात व शेती कोण करत यांची संपूर्ण माहिती पंचनामा केल्यानंतरच मिळणार आहे