जळगाव : – न्यायालयाने जामीन नामंजूर केले म्हणून २६ वर्षीय बंदीवानाने जिल्हा कारागृहात बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या दरम्यानात घडली. चेतन पितांबर सोनार असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या बंदीवानाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गुरूवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन सोनार हा २४ ऑगस्ट २०२० पासून जिल्हा कारागृह येथे भादंवि ३५४, ३७६, पोस्को अंतर्गत न्यायालयाच्या आदेशाने बंदी आहे. गुरूवारी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास त्याने कारागृहातील बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कारागृह शिपाई अरविंद म्हस्के यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच ही बाब तुरूंग अधिकारी संतोष पवार यांना कळविली.
पवार यांनी बंदी चेतन सोनार याची विचारपूस केल्यावर त्याने न्यायालयाने जामीन नामंजूर केला म्हणून खिळा गिळून घेतल्याचे सांगितले. पवार यांनी लागलीच रूग्णवाहिका बोलवून बंदीवानाला जिल्हा कारागृहात उपचारार्थ नेले. एक्स-रे रिपोर्ट काढल्यावर बंदीवानाने खिळा गिळल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तुरूंग अधिकारी संतोष पवार यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चेतन सोनार याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलंत का ?
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.