जनता बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांचे तिळगुळ वाटप करून स्वागत.

Spread the love

एरंडोल शहर प्रतिनिधी

एरंडोल-जळगाव जनता सहकारी बँकेच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित येथील मारवाडी गल्लीतील शाखेत ग्राहकांचे तिळगुळ देऊन स्वागत करण्यात आले.तहसीलदार सुचिता चव्हाण,पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी बँकेस भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

एरंडोल येथील जनता बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित तहसीलदार सुचिता चव्हाण त्यांचेसोबत लीना जोशी त्यांचेसोबत व्यवस्थापक विलास मते व कर्मचारी.
   जळगाव जनता सहकारी बँकेच्या शाखेत वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.ग्राहक,सभासद यांचे तिळगुळ आणि पेढे देऊन स्वागत करण्यात आले.तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी बँकेस भेट देऊन बॅंकेबाबत माहिती जाणून घेतली.बँकेमार्फत महिला बचत गट,लहान व्यावसायिक,सभासद यांच्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच कर्ज सुविधा याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.कोरोनाच्या संकटात बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेल्या सेवेबद्दल तसेच लहान व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.बँकेच्या सभासद लीना जोशी यांनी तहसीलदार सुचिता चव्हाण यांचे स्वागत केले.पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांचे बँकेचे स्थानिक सल्लागार मंडळाचे सदस्य आल्हाद जोशी यांनी स्वागत केले.प्रांताधिकारी विनय गोसावी,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांचेसह अनेक सभासदांनी दूरध्वनीवरून बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बँकेचे व्यवस्थापक विलास मते यांनी बँकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.बँकेचे रोखपाल शरद भालेराव यांनी जळगाव येथील जी.एस.ग्राउंडवर काढलेल्या भव्य रांगोळीची लिमका बुक रेकॉर्ड झाल्याबद्दल तहसीलदार सुचिता चव्हाण आणि मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी बंकेत उपस्थित ग्राहक आणि सभासद यांनी बँकेच्या सोयी व सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमास बँकेचे अधिकारी गौरव देशमुख,राजेंद्र पाटील,तक्रार निवारण समितीचे सदस्य अजेंद्र पाटील,स्थानिक सल्लागार मंडळाचे सदस्य शैलेश ठाकूर,पालिकेचे कार्यालय अधिक्षक हितेश जोगी,कुंदन सोळंकी,नितीन महाजन यांचेसह सभासद व ग्राहक उपस्थित होते.स्थापना दिनानिमित बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ काढण्यात आलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

टीम झुंजार