मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषकाच्या गट २ च्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर ५ गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. शाहीन शाह आफ्रिदीने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट (४/२२) गोलंदाजी केली. अॅडलेडमध्ये विजयासाठी १२८ धावांचे माफक लक्ष्य पाकिस्तानने ११ चेंडू राखून गाठले.
फलंदाजी करताना बांगलादेशचा सलामीवीर नजमुल हुसेन शांतोने ५४ धावा केल्या, तर अफिफ हुसेन २४ धावांवर नाबाद राहिला. नंतर पाकिस्तानने १८.१ षटकात ५ बाद १२८ धावा केल्या. मोहम्मद रिझवानने ३२ चेंडूत ३२ धावा केल्या, तर मोहम्मद हरिसने १८ चेंडूंत ३१ धावा केल्या. बांगलादेशकडून नसुम अहमद (१/१४) सर्वोत्तम गोलंदाज ठरला. शाहीन शाह आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.