पिकविम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बँकेसमोर ठिय्या आंदोलन.

Spread the love

निंभोरा ता.रावेर प्रतिनिधी परमानंद शेलोडे


रावेर :- पिकविम्याची रक्कम मिळत नसल्याने बँके कडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी स्टेट बँकेचे व्यवस्थापक राधेश्याम मुंगमुळे यांना निवेदनाद्वारे एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

तसेच शेतकऱ्यांना गेल्या एक ते दीड महिन्यांपासून रावेर येथील रावेर ते निंभोरा फेऱ्या मारणे सुरू होते परंतु विमा कंपनी व बँकेकडून न्याय मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाल्याने आज निंभोरा स्टेट बँक समोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी, सुनील कोंडे,दिलीप सोनवणे,धीरज भंगाळे,जगदीश बढे, विपीन झांबरे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार