मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गेली २१ वर्षे कार्यरत असलेल्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स कर्मचारी सहकारी पतपेढीत श्री समर्थ समिती पॅनेल हे कंपनीबाहेरील हस्तक्षेपापासून आलिप्त राहिल्याची परंपरा आणि ओळख बाळगून आहे. या समितीच्या विद्यमान संचालकांचे पॅनेलचे १५ उमेदवार संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक रिंगणात आहेत.
समीर लाड, रमेश शिंदे, विजय कासेकर, प्रविण चव्हाण, सदीप दळवी, सचिन पवार, निशांत नांदगांवकर, शीतल पेठे, विनोद चौहान, किरण जाधव हे सर्वसाधारण मतदारसंघातून तर स्मिता मेस्त्री, सुप्रिया पवार, महिला राखीव, प्रमोद तवटे इतर मागासवर्गीय, पांडुरंग दाईंगडे विशेष मागासवर्ग तर संदीप कोंडविलकर हे अनुसूचित जाती-जमाती या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. ही निवडणूक शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी होत असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी मतदानाची वेळ आहे.
पतपेढीचे ३ हजारांहून अधिक मतदार असून अधिकाधिक सभासदांनी उपस्थित राहून मतदान करावे, असे आवाहन श्री समर्थ समितीच्या विद्यमान संचालकांचे पॅनेलच्या वतीने करण्यात आले आहे. पॅनेलची प्रचारात आघाडी असून कामगार व अधिकारी वर्गाचा पॅनेलला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हे वाचले का?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.