इंस्टाग्राम पत्नी बनवत होती रील, नाराज पतीने नंतर जे केलं ते धक्कादायकच..

Spread the love

तिरुपूर : इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर रील पोस्ट करण्याचा छंद एका महिलेला महागात पडला आहे. सोशल मीडियावर रील बनवल्याने नाराज झालेल्या पतीने पत्नीची शॉलने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

वास्तविक, जिल्ह्यातील दिंडुगल येथील रहिवासी असलेले ३८ वर्षीय अमृतलिंगम हे तेन्नमपालयम भाजी मंडईत रोजंदारीवर काम करतात. तर त्यांची पत्नी चित्रा एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होती. दोघेही शहरातील सालेम नगर येथे भाड्याने राहत होते.

असे सांगण्यात आले की चित्राला टिकटॉक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील शेअर करण्याची सवय होती. अमृतलिंगम याने चित्रासोबत अनेकवेळा भांडण केले होते, कारण ती यात जास्त वेळ घालवत होती.

इतकेच नाही तर फॉलोअर्सची चांगली संख्या वाढल्यावर चित्राने अभिनयाच्या जगात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी ती दोन महिन्यांपूर्वी चेन्नईला गेली होती.

आरोपी अमृतलिंगम भाजी मंडईत रोजंदारीचे काम करत होता.ही महिला आपल्या मुलीच्या लग्नासाठी गेल्या आठवड्यातच परतली होती आणि कार्यक्रमानंतर चेन्नईला जाण्याच्या तयारीत होती, परंतु तिचा पती अमृतलिंगम तिला सोडू इच्छित नव्हता.

यादरम्यान चित्राच्या रील अपलोड करण्याची सवय आणि चित्रपटात काम करण्याची तिची इच्छा यावरून दोघांमध्ये वाद झाला, त्याचे रुपांतर भांडणात झाले. जिथे अमृतलिंगमने शाल वापरून चित्राचा गळा दाबला. ती बेशुद्ध पडताच घाबरलेल्या पतीने घरातून पळ काढला आणि नंतर फोन करून आपल्या मुलीला या प्रकरणाची माहिती दिली.

विवाहित मुलगी सासरच्या घरातून माहेरी पोहोचली तेव्हा घरात आई मृतावस्थेत पडल्याचे तिला दिसले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार