मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने युवांसाठी सातत्याने सर्जनशील व प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, साहित्य रंगमंचीय कलाविष्कार, पत्रकारिता आणि इनोव्हेटर या क्षेत्रांतील विविध गुणवंत युवांना सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये २१,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्या त्या क्षेत्रामधील अभ्यासू मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०२१ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व ऑनलाइन फॉर्म www.chavancentre.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख सोमवार, दि.१८ नोव्हेंबर २०२२ असून या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता संतोष मेकाले – 9860740569/मनिषा खिल्लारे – 9022716913 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.