”कहाँ गया रे ओ संजय राऊत?” असं म्हणणारे मंत्री गुलाबराव पाटील संजय राऊत यांच्या सुटकेवर म्हणाले, पहा व्हिडिओ.

Spread the love

जळगाव : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या भाषण शैलीसाठी ओळखले जातात, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांनी अनेक वेळा एकमेकांवर टीका केली. मात्र पत्राचाळ कथित घोटाळ्या प्रकरणी जेव्हा संजय राऊत हे तुरुंगात होते, तेव्हा गुलाबराव पाटील यांनी बहुतांश सभेत त्यांच्यावर निशाणा साधला होता. एका सभेत तर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर फिल्मीस्टाईल टीका केली होती. मात्र संजय राऊत यांना ९ नोव्हेंबर रोजी १०२ दिवसांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला.यानंतर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या सुटकेवर देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

याआधी जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी फिल्मी स्टाईलमध्ये बोलताना म्हटलं होतं, “कहाँ गया रे ओ संजय राऊत?, संजय राऊत इज चक्की पिसिंग पिसिंग अॅण्ड पिसिंग”, असा फिल्मी स्टाईल दणका गुलाबराव यांनी हाणला होता.

मात्र संजय राऊत यांच्या सुटकेनंतर आता गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे, त्यांचा नेता तुरुंगातून बाहेर येत आहे, स्वाभाविक आहे त्यांना आनंद होणार आहे.अशी अतिशय मवाळ प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या सुटकेनंतर दिली आहे.

पहा व्हिडिओ :

तसेच पुण्याच्या राष्ट्र्वादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी तुमच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे, त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात की, यावर ते ध चा म करण्यात आघाडीवर आहेत, आणि आमची महिला आघाडी यावर रुपाली पाटील यांना उत्तर देणार आहे मी नाही.

गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर जळगाव ग्रामीणमधून निवडून आलेले आमदार आहेत, ते सध्या शिंदे गटात आहेत, तसेच मंत्री आहेत.
गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सभा घेतल्या आहेत, त्या सभेत त्यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार