इंग्लंडने १० गडी राखून केला भारताचा दारूण पराभव अंतिम फेरीत पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना

Spread the love

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : १९९२ नंतर म्हणजे तीस वर्षांनंतर मेलबर्न येथे पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड अंतिम सामना होईल. दोन पूर्णपणे इन – फॉर्म संघ ज्यांचा आत्मविश्वास शिखरावर अाहे ते अंतिम सामन्यात भिडतील. जसे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी काल फॉर्ममध्ये विजयी पुनरागमन केले तसे अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी भारताचे आक्रमण खोडून काढले आणि प्रतिपक्षाच्या मर्यादा वेशीवर टांगल्या. उपांत्य फेरीत चार षटके आणि दहा गडी राखून विजय. भारतासाठी हा निकाल २०१६ मध्ये वानखेडेवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीचा प्रतिध्वनी होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली.

फलंदाजीला उतरताना भारताने विराट कोहलीच्या ४० चेंडूत ५० धावा आणि हार्दिक पांड्याच्या ३३ चेंडूत ६३ धावा केल्यानंतर ६ बाद १६८ धावा केल्या. ख्रिस जॉर्डन इंग्लंडकडून ४३ धावांत ३ विकेट घेऊन परतला. कोहलीने स्पर्धेत चार अर्धशतकं झळकावली पण ती वैयक्तिक विक्रम करण्यासाठी. संघासाठी झोकून देण्याची त्याची वृत्ती नाही. अ‍ॅलेक्स हेल्स (८६) आणि कर्णधार जोस बटलर (८०) यांनी अखंड सलामीच्या भागीदारीत चमक दाखवल्याने गुरुवारी अॅडलेड ओव्हल येथे भारताचा १० गडी राखून पराभव करून ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय गोलंदाजांनी अतिशय निष्प्रभ मारा केला. अ‍ॅलेक्स हेल्सला (८६*) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

२०१९ मध्ये घरच्या भूमीवर ५० षटकांचा विश्वचषक जिंकणारा इंग्लंड आता मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानशी सामना करताना व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये दोन्ही जागतिक ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनू शकतो.  टी२० विश्वचषकातील सर्वोच्च भागीदारी: १७०* जे बटलर – ए हेल्स अॅडलेड विरुद्ध भारत २०२२, १६८ क्यू डी कॉक – आर रोसोउ विरुद्ध बांगलादेश २०२२, १६६ एम जयवर्धने – के संगकारा विरुद्ध वेस्ट इंडिज २०१०, १५२* बाबर आझम – मोहम्मद रिझवान विरुद्ध भारत २०२१ टी२० मध्ये भारत विरुद्ध कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी: १७४* क्यू डी कॉक – डी मिलर गुवाहाटी २०२२, १७०* जे बटलर – ए हेल्स अॅडलेड २०२२, १५२* बाबर आझम – मोहम्मद रिझवान दुबई २०२१

टी२० मध्ये इंग्लंडसाठी सर्वोच्च भागीदारी: १८२ डी मालन – ई मॉर्गन विरुद्ध न्यूझीलंड नेपियर २०१९, १७०* जे बटलर – ए हेल्स विरुद्ध इंड अॅडलेड २०२२, १६७* जे बटलर – डी मालन विरुद्ध साऊथ आफ्रिका केप टाउन २०२०। टी२० मध्ये एकही विकेट न गमावता पाठलाग केलेले सर्वोच्च लक्ष्य: २०० पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कराची २०२२ (बाबर, रिजवान), १७० न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हॅमिल्टन २०१६ (गुप्टिल, विल्यमसन), १६९ इंग्लैंड विरुद्ध भारत अॅडलेड २०२२ (बटलर, हेल्स)

टीम झुंजार