राज्य उत्पादन शुल्क विभाग अँक्शन मोडवर खिर्डी येथील अवैध दारू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई.

Spread the love

निंभोरा ता.रावेर प्रतिनिधी परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील खिर्डी येथे अवैध रित्या दारू गुत्ते सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक जळगांव मा. जितेंद्र गोगावले साहेब यांच्या आदेशानुसार भुसावळ येथील विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकाने ९-११-२२ रोजी खिर्डी येथे छापा टाकून एकूण ३६२०रू किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

घटनास्थळी अवैध दारू गुत्ता चालक डिगंबर भागवत कोळी,तसेच सदर दारूगुत्त्यावर
मद्यसेवन करतांना ज्ञानेश्वर कोचुरे, भास्कर लक्ष्मण कोळी,हे आढळून आले असता त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम६८ अ,ब कलम ८४ अन्वये कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला.भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय निरीक्षक यांनी मद्यसेवन करणाऱ्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून दोषारोप पत्र मा.न्यायालयात सादर केले असता.

तिन्ही आरोपींना मा.न्यायालयाने दारुगुत्ता चालकास २५०००रू. व मद्यसेवन करणाऱ्यांना प्रत्येकी ३०००रू. व या पूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये मद्यसेवन करणाऱ्यांना ४०००रू.असा एकूण ३५००० रू.चा दंडाची शिक्षा सुनावली आहे.सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता नितीन खरे यांनी आरोपींना जास्तीत जास्त कालावधीसाठी शिक्षा व जास्तीत जास्त दंड व्हावा जेणे करून अशा आरोपींना योग्य संदेश जावा याबाबत युक्तिवाद केला. सदर कारवाई.भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे,दु.निरीक्षक,राजेश सोनार, व सहकाऱ्यांनी केली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार