चेन्नई :- सध्या देशात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच तमिळनाडूत एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. बिर्याणी खाणाऱ्या पतीला पाहून पत्नी संतापली. एकटे एकटे बिर्याणी का खाताय अशी विचारणा तिनं केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. पतीनं पत्नीवर केरोसिन टाकून तिला पेटवलं. तितक्यात पत्नीनं पतीला मिठी मारली. त्यामुळे पती पत्नी भाजले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
चेन्नईजवळच्या अयनावरम पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. आगीत होरपळल्यानं पद्मावती (७०) आणि त्यांचे पती करुणाकरण (७४) यांना गंभीर इजा झाली. दोघांनी एकत्रित आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आला. मात्र मृत्यूपूर्वी पद्मावतींनी दिलेल्या जबानीतून पोलिसांना सत्य समजलं. किल्पौक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पद्मावती यांचं निधन झालं. त्याच्या काही तास आधीच त्यांनी पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि प्रकरणाचा उलगडा झाला.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करुणाकरण आणि पद्मावती अयनावरममधील टागोर नगरात वास्तव्यास होते. त्यांची चार मुलं त्याच्या त्यांच्या कुटुंबासह वेगळी राहतात. सांभाळ करायला कोणीच नसल्यानं वृद्ध दाम्पत्य तणावाखाली होतं. दाम्पत्याची मुलं क्वचितच त्यांना भेटायला यायची. त्यांचे सातत्यानं आपापसात वाद व्हायचे.
घटना घडली त्यावेळी शेजाऱ्यांना दाम्पत्याच्या घरातून मोठा आवाज ऐकू आला. पती, पत्नीचा आक्रोश ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यावेळी दोघे बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांच्या शरीरावर होरपळल्याच्या जखमा होत्या. दोघांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. करुणाकरण ५० टक्के, तर पद्मावती ६५ टक्के भाजल्या होत्या.
पोलिसांनी रुग्णालयात जाऊन दोघांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पद्मावती यांच्यकडे घडल्या प्रकाराबद्दल चौकशी केली. ‘सोमवारी रात्री ८ च्या सुमारास पतीनं हॉटेलमधून बिर्याणी आणली होती. ते एकटेच बिर्याणी खात होते. माझ्यासाठी काही खायला आणलं नाही का, असा प्रश्न मी त्यांना विचारला. मलाही बिर्याणी द्या, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यांनी मला केरोसिन टाकून पेटवलं. मी जळत असताना त्यांना मिठी मारली,’ असं पद्मावती यांनी पोलिसांना सांगितलं.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४