लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- कोरोना मुळे लांबलेली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा दि. ०९/११/२०२२,बुधवार पासून लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेली आहे.स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चवदा व सतरा वयोगटातील खेळाडूंसाठी हॉलीबॉल व बुद्धिबळ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल,डॉ.आर.एन. लाहोटी इंग्लिश स्कूल, सुलतानपूर,सहकार विद्यामंदिर,बिबी,सहकार विद्यामंदिर सुलतानपूर,श्री. शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोणार,महाराणा प्रताप हायस्कूल, लोणार, शासकीय निवासी शाळा, लोणार या शाळांचे संघ उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
सदर लोणार तालुकास्तरीय स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा संयोजक विठ्ठल घारोड तर प्रमुख अतिथी म्हणून लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी,उपप्राचार्य शेख नबील,प्रा.रफिक शेख, तालुका शिक्षक मित्र साबळे साहेब लाभले.यावेळी क्रीडाशिक्षक भानापुरे, डोळस,विठ्ठल जाधव, लियाकत अली व अन्य क्रीडाशिक्षक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.आर.ओ.अंकुश चव्हाण यांनी केले.तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल क्रिडा संयोजक विठ्ठल घारोड यांनी संस्थाध्यक्ष शेख मसूद शेख उस्मान व संचालक मोहम्मद फैसल यांचे आभार मानत अभिनंदन केले व मैदानी स्पर्धा मुलांचा कसा सर्वांगीण विकास करतात ते सांगितले व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये होणाऱ्या सर्व क्रीडा प्रकारांची व त्याच्या नियोजनाची माहिती दिली व नंतर सकाळी अकराच्या क्रीडा स्पर्धा प्रारंभ झाल्या.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४