निंभोरा ता.रावेर प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा स्टेशन जवळ दोन्ही बाजूने निंभोरा व खिर्डी गावाचा मुख्य वाहतुकीचा रस्ता असल्याने रेल्वे विभागामार्फत सदर ठिकाणी उड्डाणपूल (FoB) प्रस्तावित करण्यात आलेला असुन, सध्या उड्डाणपूलाचे (FoB) काम प्रगतिपथावर आहे. आज सदर ठिकाणी रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन उड्डाणपूल (FoB) ची पाहणी केली. तसेच रेल्वे अधिकाऱ्याकडून कामाच्या प्रगतीबाबत यावेळी माहिती घेऊन, योग्य त्या सुचना केल्या.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस श्री.महेश चौधरी, श्री. हरलाल कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस श्री. शुभम पाटील, श्री. दुर्गेश पाटील, श्री. प्रमोद रोझोदकर, श्री. राजेंद्र महाले, श्री. रवींद्र महाले, श्री. विजय सोबर, श्री. राजू बोरसे, श्री. मनोज सोबर, श्री. पप्पू कोळंबे, श्री. सचिन महाले, श्री. आशिष बोरसे ई. उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






