अमळनेर :- अमळनेर शहरातील देशमुख नगर भागात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने जानवे शिवारात असणाऱ्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मयत तरुणाचा उद्या दि.13 नोव्हेंबर रोजी साखरपुडा होणार होता. मात्र साखरपुड्याच्या आदल्या दिवशी त्याने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही.
या बाबत माहिती अशी की तेजस मनोहर मगर वय 28 रा.देशमुख नगर असे मृत तरुणाचे नाव असून तो दि.12 रोजी सकाळी साखरपुड्याची तयारी म्हणून सलून ला जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता.मात्र 10 वाजेच्या सुमारास त्याच्या मृत्यूची बातमी घरी आल्याने कुटुंबावर संकट कोसळले.जानवे शिवारात एका विहिरीत त्याने उडी घेऊन आत्महत्या केली.
ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला असून त्याच्या वर दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत तेजस चे लग्न ठरले होते.उद्या दि.13 नोव्हेंबर रोजी त्याचा साखरपुडा होणार होता.मात्र साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तेजसने एवढी टोकाची भूमिका का घेतली आत्महत्या का केली हे समजले नाही.जानवे पोलीस पाटील यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहे.