मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकल्यावर रविवारी झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला विजयासाठी १३८ धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (३२) आणि शान मसूद (३८) यांनी चांगली सुरुवात केली, पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी दक्षिण आशियाई संघाला स्थिरावू दिले नाही
शेवटच्या षटकांमध्ये विकेट्स गडगडल्या आणि आठ बाद १३७ धावा केल्या. अष्टपैलू सॅम कुरनने आपल्या चार षटकांत ३/१२ अशी दयनीय अवस्था केली, मोहम्मद रिझवानला १५ धावांवर बाद केल्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये आणखी दोन गडी बाद केले. लेग-स्पिनर आदिल रशीद २/२२ यांनीही पाकिस्तानला रोखण्यात मोलाचा वाटा उचलला, त्याने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोहम्मद हरीसला आठ धावांवर बाद केल्यानंतर बाबरला बाद करण्यासाठी शानदार झेल घेतला.
विजयाच्या समीप असताना मोईन अली (१९) बाद झाल्यावर बेन स्टोक्सने चौकार मारत आपले अर्धशतक पुर्ण केले. त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर विजयी एकेरी धाव घेतली. कर्णधार जोस बटलरने (२६) हॅरी ब्रुक (२०) यांनी चांगली साथ दिली.
सॅम कुरनने सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.