VIDEO : अंगावर काटा आणणारी घटना ‌‌, रिव्हर्स घेताना बसची भिंतीला धडक, भिंत कोसळून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

पालघर : – सध्या महाराष्ट्रात बस अपघाताच्या घटना समोर येत आहे अश्यातच पालघर जिल्ह्यातील जव्हार डेपोत मोठी दुर्घटना घडली. एसटी बस चालकाच्या चुकीमुळे या दुर्घटने एका लहान मुलाचा नाहक मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून अतिशय मन हेलावणाऱ्या आणि वेदननादायी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. १० नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

घटनेत एसटी बसच्या धडकेने भिंत कोसळून ती अंगावर पडल्याने एका लहान मुला जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना जव्हार येथे घडली आहे. जव्हार डेपोतील ही घटना आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

पहा व्हिडिओ :

डहाणू- जव्हार ही बस जव्हार डेपोत रिव्हर्स घेताना बसची भिंतीला धडक लागली. या दुर्घटनेत ११ वर्षीय ओवीस मडकिया या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर पंधरा वर्षीय सिंनाल हा मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी सिंनाल याच्यावर येथील जव्हार कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बसचे चालक आणि वाहक दोघेही फरार झाले आहेत. जव्हार पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार